Category: Blogs
-
उपरा

उपरा अगदी सराईतपणे माझ्या दवाखान्यातल्या खोलीचा दरवाजा उघडून तो आत आला. आला तेव्हाच त्याच्या चेहऱ्यावर अगदी ओळखीचं हसू होतं. जणू माझा अगदी जवळचा मित्रच असावा, रोजच्या गाठी भेटीतला. आत येऊन त्यानं टेबलासमोरची खुर्ची मागे खेचली आणि त्यात स्वतःला ऐसपैस झोकून दिलं. टेबलाच्या कडेवर बोटं नाचवीत तो माझ्याकडे पाहत, हसत राहिला. पुन्हा एकदा तेच परिचयाचं हास्य.…
-
प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट सातव म्हणजे एकदम दिलखुलास मनुष्य. गोल चेहरा, कल्लेदार मिशा आणि त्याही इतक्या कल्लेदार की पूर्वी कुणी म्हणत तशी एक-दोन लिंबंसुद्धा त्यात सहज लपावीत. हसरे बोलके डोळे. सगळ्या अंगावर, चेहऱ्यावर एक प्रकारचा तेलकट रापलेपणा. डोक्यावर केस तसे फारसे दाट नाहीतच, पण आहेत तेही तेलानं चापून चोपून बसवलेले. दवाखान्यात येतील तर तेही एखाद्या झंझावातासारखे. दरवाजा…
-
पितृहट्ट

पितृहट्ट कदम हॉस्पिटलमध्ये येऊन पोचले तेव्हा रात्रीचे आठ तरी वाजले असतील. दवाखान्याचं माझं काम आटोपून मी बाहेर पडणार होतो, तेव्हाच माझा फोन वाजला. ‘साधारण पन्नास वर्षांचा कदम नावाचा मेल पेशंट अॅडमिट करतोय सर, सकाळीच कधी तरी छातीत दुखून गेलं म्हणतोय. आठ-दहा तास तरी उलटून गेले असतील. इ.सी.जी. काढलाय, सर. त्याच्यात हार्ट अॅटॅक दिसतोय, पण आता…
-
मातृभक्ती?

मातृभक्ती? स्वातीचा फोन आला तेव्हा खरं तर मी अगदी पूर्ण गडबडीत होतो. समोर कुठलासा नवीन पेशंट बसलेला. डोक्यात सगळे विचार त्याचे, सुटायला कठीण असं काही तरी कोडं असतं एकेक पेशंट म्हणजे. अशा वेळी शांतपणे विचार करावा म्हटलं तर हे असे फोन मधे मधे येऊन विघ्न आणतात. विचाराची आपली एक काही दिशा असते, ती पार विस्कटून…
-
ये रे, ये रे पैशा –

ये रे, ये रे पैशा – खोपकरांच्या एकूण आयुष्याचं वर्णन एका वाक्यात करायचं म्हटलं तरी ते शक्य होतं. त्यांनी आयुष्यभर फक्त पैशावर प्रेम केलं. अगदी मनापासून प्रेम केलं. ते प्रेम नुसतं तीव्र नव्हतं, तर व्यसनी होतं. पैशाशिवाय इतर कशाचं त्यांना जणू भान नव्हतं. जे जे म्हणून या प्रेमाच्या आड येईल अशी भीती त्यांना वाटली त्या…
-
आपुले मरण

आपुले मरण दरवाजा बंद होता. नव्यानं रंगवलेलं दार. तशीच नवी कोरी रंगवलेली भिंत बाजूला. नवीन रंगाचा वासही ताजाच असावा बहुतेक. नाकाला झोंबत होता माझ्या. दरवाजावर त्याचा क्रमांक दाखवणारी पाटी. चकचकणारी धातूची. क्रमांक 301. अगदी ठळकपणे आणि निर्विकारपणे सांगत होती ती. ही खोली तीनशे एक नंबरची आहे असा तिचा अर्थ. हा आणि इतकाच अर्थ त्या पाटीचा.…
-
My Corona

My Corona Chapter one It was a cool pleasant morning in November 2020. As I was striding across the gravel-studded foot-way leading to the hospital, I had a strange feeling of newness; everything around me was as if new, the big porch leading to the hospital entrance, the temple on my right, the scantily parked…
-
मुलाखत

मुलाखत मुख्य इमारतीचॆ बांधकाम चालू होते. त्या इमारतीच्या बाहेर दुसरी एक तात्पुरती शेडवजा किरकोळ बांधकाम केलेली छोटी एक मजली जागा होती. बाहेरच्या बाजूला साधारण ऐसपैस वाटावा इतपत मोठा व्हरांडा होता, तीनही बाजूंनी खुला असलेला, हवेशीर. सगळ्या डॉक्टर मंडळींच्या मुलाखती तिथे होणार होत्या. मुलाखतीची मला सांगितलेली वेळ सकाळी नऊची होती आणि आत्ता सकाळचा नऊ-सव्वा नऊचा सुमार…
-
गोची

मेधा माझ्या दवाखान्यात आली, तेव्हा थोडी बिचकतच आली. आधीचा काही परिचय नव्हता, कुणीसं माझं नाव सुचवलं म्हणून आली. सुमारे तिशीचं वय. सडपातळ बांधा. जीन्स आणि टी शर्ट असा साधारण आधुनिक वाटावा असा पेहेराव. गळ्यात मंगळसूत्र वगैरे नव्हतं, पण विवाहित होती. (हे मला अर्थात नंतरच समजलं, तिच्या बोलण्यातून) ती खोलीत आली तसा मंद असा एक सुवास…
-
फसवणूक

कॉलेजकडे जाणारा रस्ता चढाचा होता. सकाळचे नऊ वाजायला आलेले. लेक्चरला उशीर होणार बहुतेक अशा भीतीने जिवाचा पार आटापिटा करत सायकल ताणत होतो. पेडलवर उभा होत दोन्ही बाजूंना झुकत सगळ्या शरीराचं वजन टाकत गाडीला वेग देत होतो. अशा वेळेला नेमकी रस्त्यावर मरणाची गर्दी असते. रहदारीशी आट्य़ापाट्य़ा खेळत वाट काढावी लागते. एखाद्या तीरासारखा कॉलेजच्या फाटकातून आत घुसलो.…
-
अध्यात्म

माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी खोलीच्या दारावर टकटक केलं आणि मग दरवाजा ढकलला, तेव्हा ते समोर खाटेवर बसलेले मला दिसले. माझे नवे पेशंट, स्वामीजी. वय पन्नाशीच्यापेक्षा कमीच असणार. उन्हाने रापलेला वाटावा असा काळवंडलेला चेहरा, अर्धवट वाढलेले विस्कटलेले पांढरे केस. तसेच अर्धवट वाढलेले पांढरे दाढीचे खुंट. त्यांच्या अंगावर मळलेला असा पुरातन शर्ट होता. इतका मळलेला की तो…
-
खेळ मनाचे

उषाताईंचा आणि माझा तसा काही फारसा प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. त्यांचे पती वामनराव हे खरे माझे पेशंट. गेली काही वर्षे अगदी नियमित येणारे. एकुलत्या एक मुलाला भेटायला म्हणून वामनराव सपत्नीक अमेरिकेत गेले तेव्हा तिथेच कधी तरी त्यांनाही नकळत त्यांना हार्ट अॅटॅक आला. कुठल्या तरी कारणाने तपासणी करताना हे तिथे लक्षात आले. मग अशा वेळी जी…
-
मृत्यू

अनिल माझा डॉक्टर मित्र होता, माझ्याबरोबर एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारा माझा सहकारी होता. त्याच्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये एका लहान बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि ही घटना त्यांचे एकूणच आयुष्य घडवणारी, बिघडवणारी ठरली. अगदी खरं तर असं का घडलं, त्यात डॉक्टर म्हणून अनिलच्या भावाची काही चूक होती का याची फारशी काहीच कल्पना मला तेव्हा नव्हती, आजही नाही.…
-
पंक्चर

दुपारचे बारा वाजले असतील नसतील, अशी वेळ. आज कधी नव्हे तो जरा लवकरच दवाखान्याचे सकाळचे काम आटोपले. चक्क अख्खी दुपार आज रिकामी मिळणार अशा आनंदात मी दवाखान्यातून उतरून रस्त्यावर आलो. सकाळच्या वेळेचं एक बरं असतं, गाडी लावायला अगदी खालीच रस्त्यावर जागा मिळते. काम झाल्यावर गाडी काढायला एकदम सोपं पडतं. अगदी रस्तासुद्धा ओलांडायला नको, नुसतं उतरलं…
-
विम्याची ऐशी तैसी -७

किस्सा कितवा? (मागील लेखावरून पुढे चालू- विम्यासंदर्भात किती तरी किस्से मी सांगितले, इतके की कदाचित त्यात एक प्रकारचा तोच तोपणा येईल की काय अशी भीती वाटावी. कितीतरी वेगवेगळी आहेत ही माणसे, सुशिक्षित, म्हटलं तर काही अशिक्षित, वयस्कर, तरुण, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातली ही माणसे, उत्पन्नाचा स्तरही म्हणावा तर प्रत्येकाचा वेगळा, पण विमा हा विषय निघाला की…
-
विम्याची ऐशी तैशी -६

किस्सा पाचवा (मागील लेखावरून पुढे चालू तिखे नेहमीप्रमाणे दवाखान्यात आले. जेव्हा ते आत आले तेव्हा मी आधीच्या पेशंटच्या नोंदी उतरवून घेण्यात गर्क होतो. माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटच्या नोंदी नेहमी अगदी अद्ययावत ठेवलेल्या असतात. माझ्याकडच्या कॉम्प्युटरवर त्या तपशीलवार नोंदलेल्या असतात. माझी स्मरणशक्ती थोडी कच्ची असल्यामुळे असेल कदाचित, पण या तपशिलांचा मला माझ्या कामात मोठा उपयोग होतो.…
-
विम्याची ऐशी तैशी -५

किस्सा चौथा (मागील लेखावरून पुढे चालू-) शिल्पा गावडे, सुमारे तीस वर्षांची अविवाहित मुलगी. तिला नक्की कुणी माझ्याकडे पाठवले ते आठवत नाही. पण कुठल्या तरी चांगल्या परिचयातून ती आली होती एवढे मात्र नक्की. शिल्पाची तब्ब्येत बरी नसे, वारंवार उलट्या, जुलाब होत. बारीक सारीक बरेच उपचार झालेले तरीही बरे वाटेना म्हणून एकदा माझे मत घ्यावे अशा हेतूने…
-
विम्याची ऐशी तैशी -४

मागील लेखावरून पुढे चालू- किस्सा तिसरा डॉ. खरे. शहरातले प्रतिष्ठित नावाजलेले डॉक्टर. वयाने माझ्याशी वडिलकीचे नाते असलेले. ते नुसतेच डॉक्टर नव्हते, तर डॉक्टर असलेले सामाजिक कार्यकर्तेसुद्धा होते. आपल्या व्यवसायाइतकाच वेळ ते अशा वैद्यकीय सामाजिक कामांना देत. कित्येक वैद्यकीय संघटनांमध्ये ते सक्रिय असत. व्यक्तिगत पातळीवर काय किंवा सार्वजनिक पातळीवर काय, कुठेही डॉक्टरवर अन्याय झाला किंवा होण्याची…
-
विम्याची ऐशी तैशी – ३

मागील लेखावरून पुढे चालू- किस्सा दुसरा आता मी जी गोष्ट सांगणार आहे, ती आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने अगदीच साधारण आहे, यात सांगण्यासारखे विशेष ते काय आहे, असेच एखाद्याला वाटेल. आणि असे वाटेल हेच तर खरे दुर्दैव आहे. वीसेक वर्षाचा प्रमोद. आमच्या हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा पहाटेची वेळ होती. तातडीच्या विभागात तो आला तेव्हा आमच्या डॉक्टरने त्याला तपासले.…
-
विम्याची ऐशी तैशी – २

किस्सा पहिला (-मागील लेखावरून पुढे चालू ) श्री. नगरकर, वय वर्षे सुमारे अठ्ठावन. नगरकरांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये दाखल होते. वेळीच औषधोपचार झाले. अगदी कुठल्याही विशेष अडचणी न होता नगरकर बरे झाले. आपला पेशंट असा विना तक्रार बरा झाला की डॉक्टरला एक समाधान असतं, त्या समाधानात मी होतो. आज नगरकरांना डिस्चार्ज देणार…
-
विम्याची ऐशी तैशी -१

विमा शब्द कोश आरोग्य विमा हा आजकाल परवलीचा विषय झाला आहे. हा विमा उतरवणे म्हणजे सुज्ञपणा. सुजाणपणा. अशी समजूत आहे, ज्या कोणाची तशी नसेल त्यांची ती करून देण्यात येत आहे. यात विमा कंपन्यांचा सहभाग आहे, सरकारचा सहभाग आहे. तथाकथित अर्थ तज्ज्ञांचा आहे. आणि इतरही बऱ्याच सामान्य लोकांचा आहे जे स्वतःला समजूतदार आणि हुशार समजतात. या…
-
जीवन मूल्य

जीवन मूल्य डॉ. दातार वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे होते. मी अगदीच नवथर तरुण तर ते मध्यम वयीन म्हणावेत असे. ते मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करणारे सर्जन होते. त्यांचं एक छोटेखानी हॉस्पिटल होतं त्यात ते मूत्रपिंडाच्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत. इतक्या छोट्या हॉस्पिटलमध्ये इतक्या कमी मदतीवर आणि इतक्या कमी उपकरणांनिशी अशा शस्त्रक्रिया करायला एका निधड्या छातीची गरज होती,…
-
चूक? कुणाची?

चूक? कुणाची? त्या दिवशी राघवच्या दवाखान्यात जे काही घडलं त्यात नक्की चूकच होती का आणि असली तर कुणाची होती हे ठरवणे कठीण आहे. त्यासाठी त्या प्रसंगाची पूर्ण तपासणी करणेच गरजेचे आहे. राघव हा माझा अगदी शाळेपासूनचा मित्र. अभ्यासात हुशार आणि त्याहून विशेष म्हणजे व्यवहार चतुर. खोडकर तसाच मनमिळावू. वर्गात इतरांच्या खोड्या काढणे, व्रात्यपणा करणे पण…
-
पोरखेळ

पोरखेळ बळकट शरीरयष्टीचे, बलदंड बाहूंचे ते तिघे तरुण एकदमच दवाखान्यात आले आणि माझ्यासमोर येऊन खुर्चीत बसले तसा मी थोडासा चपापलोच. दवाखान्यासारख्या ठिकाणी एकदम एकत्र इतके ताकदवान जवान पाहण्याची आम्हाला सवय नसते! असे लोक एकत्र पाहण्याची वेळ म्हणजे धोक्याची घंटाच. कुठल्या तरी असंतुष्ट पेशंटने सोडलेली ही अस्त्रे असण्याची शक्यता असते. त्या जवानांना पाहिले तशी क्षणभरात माझ्या…
-
एका सिनेमामागची गोष्ट

एका सिनेमामागची गोष्ट मी बनविलेला सिनेमा खपविण्याची वेळ माझ्यावर आली, त्याचीही एक गोष्ट आहे. बऱ्यापैकी मनोरंजक म्हणावी अशी. तसा मी काही सिनेमातला वगैरे माणूस नाही, म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलो, तरी सिनेमा, संगीत अशा सारख्या कलांचा आस्वाद घेऊ शकतो, पाहू ऐकू शकतो, इतपत योग्यता माझ्याजवळ आहे. सिनेमातले नट, त्यांचे ‘glamour’, त्यांच्या ‘gossips’ या पलीकडे जाऊन सिनेमाची…
-
दारूविषयी

दारूविषयी मेडिसिन विभागात काम करताना आम्हाला दारू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वैद्यकिय आणि इतर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. आता हा आमच्या कामाचा भाग म्हणून अगदी सवयीचा झालेला प्रकार आहे, इतका की प्रत्येक नशाबाजाच्या मागे जी एक करुण कथा असते, त्यातही आता फारसा रस वाटत नाही. केवळ त्यातल्या वैद्यकिय समस्येविषयी विचार करावा, त्याला अनुरूप उपचार…
-
न्यायाची गोष्ट

न्यायाची गोष्ट माझ्या वैद्यकिय व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातली ही गोष्ट आहे. मध्यम आकाराच्या एका छोटेखानी हॉस्पिटलमध्ये मी तेव्हा माझे पेशंट ठेवत असे. माझ्यासारखेच माझे हे हॉस्पिटलही नवीन आणि अननुभवी होते. तरुण वय आणि नव्याने व्यवसायात जम बसविण्याची ईर्षा- यांच्या जोरदार मिलाफाने माझी कारकीर्द आकार घेत होती. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याजोगा एकेक पेशंट मिळणे तेव्हा दुरापास्त असे. एखादा…
-
एक होती भिकारीण

एक होती भिकारीण सांगून एखाद्याचा विश्वास बसणार नाही अशी ही गोष्ट आहे, अगदी खरी खुरी घडलेली! जेव्हा ती घटना घडत होती, तेव्हा तिचा शेवट कसा होणार याची जबरदस्त उत्सुकता माझ्या मनात दाटलेली होती. एखाद्या रहस्यकथेसारखा अगदी अनपेक्षित प्रकारे ह्या कथेचा शेवट झाला झाला तोही इतका विचित्र प्रकारे की त्याचा अर्थबोध होणेसुद्धा मुश्किल व्हावे. पहिले काही…
-
पेसमेकर

पेसमेकर सकाळची सगळी कामे आटोपली होती. हॉस्पिटलचा राउंड झाला होता. पोटात भुकेची जाणीव सुरु झालेली. कधी एकदा घरी पोचतो अशा आतुरतेत मी. रिसेप्शनपाशी पोचलो तर तिथे दीपा जणू माझी वाटच पाहात असल्यासारखी होती. मी दिसताच “सर, सर ‘ असा धावा करून तिने माझ्या हातात फोन सोपवला. ‘सर, उमेश म्हणून तुमचा कुणी मित्र आहे लाईनवर. अर्जंट…
-
ऑक्टोंबर

ऑक्टोंबर आता मी जो प्रसंग सांगणार आहे, तो अगदीच छोटा आहे. त्यामध्ये काही घटनांचा खास आकर्षक असा क्रम नाही, त्या प्रसंगाला विशेष अशी सुरुवात नाही की शेवटही नाही. जे काही घडलं, तो काही सेकंदांचा व्यवहार होता. अगदी एखाद्या टी. व्ही. मालिकेप्रमाणे लांबण लावत वाढवावा म्हटले तरी वाढविता येऊ नये असा एक व्यवहार. तरी त्याविषयी लिहिण्याचा…