Category: Blogs
-
सुरुवातीचे दिवस

सुरुवातीचे दिवस मी जेव्हा वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळच्या म्हणजे सुमारे तीस वर्षापूर्वीच्या काळातल्या काही घटना मी आतासांगणार आहे. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात हा एक अगदी वेगळा आणि स्वतंत्र अनुभव असतो. बऱ्याच वेळा हा अनुभव खेदजनक असतो, व्यवसायाची पुढे जी काहीवाटचाल झाली तिच्याशी विसंगतही असतो. पण या अनुभवातून जे काही शिक्षण होतेत्यातूनच तर त्या व्यवसायाची आणि व्यावसायिकाची जडणघडण होत असते, मीमाझ्या…
-
कट कट

कट कट हॉस्पिटलमधली काही किरकोळ कामे उरकून घरी पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा होऊन गेले होते. अख्खी दुपार आता अक्राळविक्राळपणे मोकळी माझ्यासमोर पसरणार अशी भीती मला वाटू लागलेली. इतक्यात फोन वाजला. फोन हॉस्पिटलमधून आला होता. ‘सर, तुमचे पुरंदरे पेशंट आलेत. त्यांच्या छातीत दुखतंय, Cardiac वाटतंय. त्यांना आय.सी.यू. त घेतोय,’ पलीकडून आवाज आला. बहुधा कुणी नवीन हाउसमन असावा. मी…
-
शिबिर कथा

शिबिर कथा सप्रे साहेब स्वतः माझ्या दवाखान्यात आले आणि त्यांनी स्वतः मला विनंती केली की त्यांच्या एका संस्थेसाठी मी एक आरोग्य शिबिर घ्यावे ही सगळी घटनाच मुळी मला स्वप्नवत् वाटावी अशी होती. सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातला सप्र्यांचा दबदबा केवढा तरी मोठा होता. त्यांच्या तरुणपणी त्यांनी कितीतरी महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. अगदी तत्कालीन पंतप्रधानांपर्यंत त्यांचा…